Ad will apear here
Next
सिंहगड लोणावळा संकुलमध्ये शिवजयंती उत्साहात
कुसगाव : येथील सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

१८ फेब्रुवारी २०१९ रोजी सुमारे १५० विद्यार्थ्यांनी कोराईगडला जाऊन सिंहगडवरून आलेल्या मशालीस लोणावळ्यापर्यंत आणले. या वेळी संकुल संचालक डॉ. एम एस. गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मशाल घेऊन चालत सिंहगड संकुलामध्ये अम्फी थिएटरमधील शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजाअर्चा केली.

सायंकाळी विद्यार्थ्यांनी शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढली. त्यानंतर आयोजित शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमास प्रभाकर कोंढाळकर तथा आप्पा प्रमुख पाहुणे, तर प्रमुख व्याख्याते म्हणून आकाश पाटील (बारामती) हे उपस्थित होते. सुरुवातीस ढोल-ताशांच्या गजरात आसमंत दणाणून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिव-शंभू यांच्या कार्यकर्तृत्वासंबंधी थोडक्यात भाषणे केली.



आकाश पाटील यांनी महाराजांच्या कार्य कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हत्या, असा उल्लेख करत पानशेत, कामशेत, पुनवडे धरणांचे काम केल्याचा दावा केला. दुष्काळासंबंधीची पूर्वतयारी म्हणून शेतसारा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या आयुष्यामध्ये काय करावे व काय करू नये यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवराज्याभिषेक व शंभूराजांच्या विषयीची नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. या कार्यक्रमास संकुलामधील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांसह प्राध्यापक व प्राचार्य उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMMBX
Similar Posts
‘सिंहगड’मध्ये माजी विद्यार्थी रमले जुन्या आठवणींत कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कुसगाव येथील एस.के.एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘सिंहगड इन्स्टिट्यूट’ने दिलेल्या ज्ञान व कौशल्याच्या शिदोरीवरच मार्गक्रमण करत असल्याचे सांगून ‘सिंहगड’विषयी कृतज्ञता व्यक्त केली
‘सिंहगड’मध्ये पुलवामातील शहीदांसाठी कॅन्डल मार्च कुसगाव : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करण्यासाठी व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सिंहगड लोणावळा कॅम्पसच्या वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी व प्राचार्यांनी उत्स्फूर्तपणे कॅन्डल मार्च काढला.
लोणावळ्यातील सिंहगड संकुलात कार्यशाळेचे आयोजन कुसगाव : येथील सिंहगड संकुल आणि जारो एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड संकुलात राज्यस्तरीय कार्यशाळा नऊ जुलैला आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातून एकूण ५२ ट्रेनिंग व प्लेसमेंट आधिकारी या वेळी वेळी उपस्थित होते.
काशीबाई नवले कॉलेजमध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र उत्साहात कुसगाव : येथील श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १६ व १७ फेब्रुवारी २०१९ रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिक प्रक्रिया व नाविन्यपूर्ण अध्ययन-अध्यापन हा चर्चासत्राचा विषय होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language